रत्नागिरी : या वर्षी रत्नागिरी खबरदार आयोजित वुमेन्स कार्निव्हल २०२५ ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोठ्या संखेने महिलांनी वुमेन्स कार्निव्हल ला सहकुटुंब भेट दिल्याचे पहावयास मिळाले. दररोज या कार्निव्हल मध्ये ग्राहकांना ४० हजारांची आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या शिवाय दररोज ५ हजार पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकाला ‘शॉपिंग क्वीन’ म्हणून घोषित करण्यात आले. कार्निव्हल च्या शेवटच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी एक योजना जाहीर केली. यानुसार कार्निव्हल ला सायंकाळी ७ ते ८ यावेळात पालकांसोबत भेट देणाऱ्या १२ वर्षांपर्यंत मुलांमधून एक भाग्यवान विजेता काढून त्याला सायकल बक्षीस देण्यात आले. हि योजना जाहीर झाल्याने मोठ्या संखेने या कार्निव्हल ला लहान मुलांनी देखील भेट दिली. उपस्थित मुलांमधून भाग्यवान आरोही पाटील या भाग्यवान लहान मुलीचे नाव निवडून तिला प्रायोजक सौरभ मलुष्टे यांच्या हस्ते सायकल बक्षीस देण्यात आली. यावेळी रत्नागिरी खबरदार चे संपादक हेमंत वणजू, एस एस कम्युनिकेशन चे अमोल डोंगरे, अमेय ज्वेलर्स चे अमेय वीरकर हे देखील उपस्थित होते.













