रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाद्वारे वार्षिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. स्व. गजानन शंकर तथा दादा कालेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षीपासून राज्यस्तरीय विशेष पुरस्कार, एका सत्पात्र व्यक्तीस प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता हा पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथालय सेवक हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या ग्रंथालय कार्यकर्त्यांना व ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
यावर्षीचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार स्व. गजानन शंकर तथा दादा कालेकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथलय संघाचे कार्यवाह सुनील कुबल यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार श्रीकांत पाटील व राजापूर तालुक्यातील पुरुळे ग्रामवाचनालयाच्या अध्यक्षा पल्लवी आनंद सावंत यांना घोषित झाला आहे. जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार शिरगाव येथील शिवाजी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल रश्मी रमेश शिंदे व खेड तालुक्यातील मुरडे येथील समर्थ ग्रंथालयाच्या शिल्पा श्यामसुंदर दळवी यांनी जाहीर झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 13/Jan/2025












