सिकंदरने वीस सेकंदात भोला सिंग ला केले चितपट; रत्‍नागिरीत रंगला कुस्त्यांचा थरार

रत्नागिरी : देशातील नामवंत पैलवानांनी दाखवलेल्या कुस्ती कौशल्यामुळे रत्‍नागिरीत कुस्त्यांचा थरार चांगलाच रंगला. रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित लाल मातीतील कुस्त्यांच्या मैदानात सर्व पैलवानानी मैदान गाजवले. रत्नागिरी सामंत केसरी किताबसाठी रंगलेल्या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राचा पै. सिकंदर शेखने पंजाबचा भोला सिंगवर मात केली. अवघ्या २० सेकंदात सिकंदर शेख याने भोला सिंग याला ‘फ्रंट साल्तो’ डावावर चितपट केले.

उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानिमित्त देशातील नामांकित कुस्तीगिरांची महास्पर्धा आयोजित केली होती. नावाजलेल्या कुस्तीपटूंसह १८ महिला कुस्तीपट्टू या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या वेळी लहान पैलवानांनी मैदनात कुस्त्यांचा थरार कसा असतो हे दाखवून दिले. महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध भोला सिंग अशी लढत झाली. तर महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे यांच्यातील लढतीत माऊली जमदाडेचा विजयी झाला. पै. वेताळ शेळकेने बंटी कुमारला चितपट केले. या कुस्त्यांच्या सामन्यावेळी प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले होते. ८० ते ८५ किलो वजनी गटात चार, ६० ते ६५ किलो वजनी गटात चार, ५० ते ५५ किलो वजनी गटात आठवी लढती झाल्या. ४० ते ४५ वजनी गटात सात तर ३० ते ३५ किलो वजनी गटात दहा लढती झाल्या होत्या. देशातील नामवंत कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळ सादर करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या कुस्ती स्पर्धेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या दमाच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

महिलांच्या कुस्तीने लक्ष वेधले
महिलांच्या कुस्तीने प्रक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. सुमारे १८ महिला कुस्ती पेहलवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील पहिली लढत पै. पल्लवी जाधव विरुद्ध पै. नूतन शर्मा यांच्यात रंगली. महिलांमध्ये झालेल्या आठही लढती रंगतदार होत्या. प्रेक्षकांनीही महिला कुस्तीपटूंचे कौतूक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 13-01-2025

Shanti 4