रत्नागिरी : कांद्याच्या दरात घसरण

रत्नागिरी : मागील काही महिने डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या दरात आवक वाढल्यामुळे काहीअंशी घसरण झाली आहे. रत्नागिरीत चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर ७० रुपये किलो तर बारीक कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो होते. सध्या नवीन कांदा बाजारात उपलब्ध झाला असून, त्याचे दर २० ते ३५ रुपये किलो आहेत. यासोबत कोथिंबीरची जुडीही १० ते १५ रुपयांना मिळत असून, लसणाचे दर मात्र अद्यापही चढेच आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 13/Jan/2025

Hotel waiter