वुमेन्स कार्निव्हल च्या शेवटच्या दिवशी प्रियांका पाटील ठरल्या ‘शॉपिंग क्वीन’

रत्नागिरी : रत्नागिरी खबरदार आयोजित वुमेन्स कार्निव्हल २०२५ ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दररोज या कार्निव्हल मध्ये ग्राहकांना ४० हजारांची आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या शिवाय दररोज ५ हजार पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकाला ‘शॉपिंग क्वीन’ म्हणून घोषित करण्यात आले. या शॉपिंग क्वीन ला देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे प्रायोजक होते सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे.

चौथ्या म्हणजेच अखेरच्या दिवशी ५ हजार पेक्षा जास्तची खरेदी करून प्रियांका पाटील या शॉपिंग क्वीन ठरल्या आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्याकडून ७००० रुपयांची प्रवासी बॅग, क्राऊन आणि बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हेमंत वणजु, नीता वणजु, जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स चे साळवी, अमेय वीरकर, अमोल डोंगरे आदी उपस्थित होते.