रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या सोमेश्वर येथील विश्वमंगल शांतीपीठासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात कायम भटक्या गुरांचा वावर असतो.
गाईला नैवेद्य दाखविला जातो. पण मोकाट गुरांची समस्या मोठी आहे. या मोकाट गुरांसाठी सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळा सुरू करण्यात आली आहे. ती पाच एकर जागेमध्ये वसविण्यात आली असून तेथे सुमारे २५० गाईवासरांची व्यवस्था गोशाळेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या गोशाळेसाठी समाजातल्या सर्वांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी केलेली मदत म्हणजे गोसेवा ठरू शकते. एका गाईचा महिन्याचा खर्च सुमारे तीन हजार रुपये येतो. त्यासाठी मदत करता येईल. मोकाट गाईंची व्यवस्था करण्यासाठी निवाऱ्याची गरज आहे. तो बांधण्यासाठीसुद्धा आर्थिक मदतीची गरज आहे. दर महिना एक हजार रुपये देऊन सदस्यत्व स्वीकारूनही मदत करता येईल. गोशाळेमध्ये सेवेसाठी काही व्यक्तींची आवश्यकता आहे. त्यांनीही गोशाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 14-01-2025














