गुहागर तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सुशील परिहार यांची बिनविरोध निवड

गुहागर : रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटना तालुका गुहागरच्या अध्यक्षपदी सुशील परिहार यांची सन २०२५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संपूर्ण कार्यकारिणीची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुहागर येथील तलाठी भवन येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटना तालुका गुहागरची बैठक झाली. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी निलेश पाटील, सचिव पदी शुभम जाधव, खजिनदारपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली. या सभेला गुहागर मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, हेदवी मंडळ अधिकारी, संतोष सावर्डेकर, आबलोली मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, पालशेत मंडळ अधिकारी प्रशांत कानिटकर, ज्येष्ठ ग्राम महसूल अधिकारी दीपक ताटेवाड, सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 14/Jan/2025