दापोली : कोकण कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ड्रोन पायलट प्रशिक्षण स्थापन करण्यास नागरी विमान वाहतूक महासंचलनालय, नवी दिल्ली यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. कृषी विद्यापीठात स्थापन करण्यात येणारे ड्रोन प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम वर्गातील ड्रोन चालविणारे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालन याच्यावतीने संचालक आणि सहाय्यक संचालक यांनी विद्यापीठाला भेट देऊन ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांनी तपासणी करून त्याचा अहवाल महासंचालनालयाला सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. सतीश नारखेडे यांच्या
मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा निर्माण केल्या असून, लवकरच प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे, असे वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राने प्रभारी आणि प्रकल्प प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर यांनी सांगितले आहे. पीबीसी एरोहा पुणे यांचे सोबत सामंजस्य करार करण्यात आला असून, प्रशिक्षण केंद्र संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार आहे.

प्रशिक्षण सशुल्क असून, त्याची नोंदणी विद्यापीठस्तरावर तसेच सारथी, बार्टी या संस्थेकडे नोंदणी केल्यास त्यांच्याकडून प्रशिक्षण शुल्क आणि आर्थिक सहाय्य प्राप्त होईल, अशी माहिती डॉ, सावर्डेकर यांनी दिली. लवकरच या प्रशिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.

रोजगाराचे नवे दालन
या प्रशिक्षण केंद्रामार्फत कोकणातील आणि अन्य भागतील तरूणांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन उडविण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामार्फत परवाना देण्यात येणार आहे. त्यातून रोजगारनिर्मितीचे नवीन दालन उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ६५ वर्षे बयोगटातील व्यक्ती तसेच किमान शैक्षणिक अर्हता १० वी पास असल्यास त्यांना १ आठवडयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

फवारणीसाठी ड्रोनचा वापर
कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि इतर पिकांवरती किटकनाशके, बुरशीनाशके तसेच विद्राव्य खतांच्या फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग केला जाणार आहे, ड्रोनद्वारे फवारणी केल्याने किटकनाशकांची आणि खतांची परिणामकारकता वाढणार असून शेतकन्यांनी, फवारणीसाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 16/Jan/2025