रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपूर्वी कुवारबांव येथे लोकवस्तीत दिसून आलेल्या गव्याचे दर्शन शहरापासून जवळच असलेल्या खेडशी डफळचोळवाडीतही झाले. त्या ठिकाणी गवा रस्ता ओलांडून जात असताना पाहताच नागरिकांनी खबरदारी घेतली.कुवारबाव परिसरात रेल्वेस्थानक फाटा येथे मुख्य रस्त्यावर पहाटेच्या सुमारास जंगलातून भरकटलेला गवा नागरिकांना दिसला होता. अचानक रस्त्यात आलेल्या गव्याच्या दर्शनाने त्यावेळी वाहनधारकांचीही पाचावर धारण बसली होती.
एक वाहनधारक त्या गव्याला पाहून घाबरलाही होता. पण त्या दिवशी लोकवस्तीतून निघून गेलेला गवा दोन दिवस तरी कुणाच्या नजरेत पडला नव्हता.त्यानंतर ३ दिवसांनी जवळच्या खेडशी डफळचोळवाडी परिसरात गवा शेतमळ्यात वावरताना दिसला. त्याला पाहून ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 17/Jan/2025














