रत्नागिरी : दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यामधून एका सरपंचांची निवड करण्यात आली असून, विविध कामगिरीचा आढावा घेत ही निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देशाच्या राजधानीत प्रजासत्तादिनी केंद्र शासनाच्या सूचनानुसार राज्याच्या पंचायत राज विभागाच्या संचालकांनी ही निवड केली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या गावपातळीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन ही निवड आली करण्यात आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून ३४ सरपंच विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहण्याचा मान केंद्र शासनाने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरीनजीकच्या पोमेंडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पोमेंडीसह कारवांचीवाडी गावामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 18/Jan/2025














