रत्नागिरी : धोकादायक रसायने, विषारी, ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थांचा वापर करून उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या छोटे उद्योग व कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे करणे बंधनकारक असून, विनापरवाना कारखाना चालवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यावसायिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक अ. मो. अवसरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कोल्हापूर विभागांतर्गत रत्नागिरी जिल्हा येत असून, धोकादायक रसायने, विषारी, ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थांचा वापर करुन उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या कारखाने, ज्यात २० पेक्षा कमी कामगार असले तरी कारखाने अधिनियम १९४८ च्या तरतुदी या व्यवसायांना लागू होतात. नोंदणी न करता कारखाने चालविणे हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कोल्हापूरकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 18/Jan/2025














