गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे सेवानिवृत्त

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मिलिंद गोरे सेवानिवृत्त झाले.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. गोरे यांनी ३६ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी १६ वर्षे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले.

काही काळासाठी त्यांनी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य पददेखील सांभाळले. कार्यक्रमाला कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, संस्थेचे आजीव सभासद महेश नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी व डॉ. सीमा कदम आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 18-01-2025