रत्नागिरी : केंद्रीय किनारा संरक्षण व व्यवस्थापन या अंतर्गत पोमेंडी खुर्द (काजरघाटी) येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासंबंधी चालना मिळाली आहे.
खासदार नारायण राणे यांनी या प्रश्नी लक्ष घातले आहे. तसेच याबाबत लवकरच वरिष्ठ अधिकारी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
सीआरझेड परवानगीसाठी २०१६-१७ पासून रखडलेला धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासंदर्भात खासदार नारायण राणे यांना ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, या कामाला चालना देण्यासाठी भाजप दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व युवामोर्चाचे संकेत कदम यांच्यासोबत वनविभाग कांदळवन कक्षाचे ठाकूर यांची भेट घेतली. पत्तन विभागाचे अभियंता साळुंखे यांची भेट घेतली. राणे यांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांना हे काम होणे किती अत्यावश्यक आहे, याची जाणीव करून दिली. वरील आवाहनाला दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ८/१० दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन योग्य तो अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. हे काम लवकर सुरू करण्यासाठी योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू करू, असे ठामपणे सांगितले. राणे यांनी जातीने यात लक्ष घातल्याने सर्व शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 18-01-2025














