पालकमंत्र्यांची यादी जाहीर; उदय सामंत पुन्हा रत्नागिरीचे पालकमंत्री

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. तर रत्नागिरीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा उदय सामंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक दिवसांच्या रस्सीखेचीनंतर अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक जिल्ह्यांसाठी नवीन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मागील काळातील पालकमंत्री पुन्हा एकदा नियुक्त करण्यात आले आहेत.

रत्नागिरीचे पालकमंत्री कोण?

रत्नागिरी जिल्ह्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. ही नियुक्ती शिवसेना आणि भाजप यांच्यातील सहमतीनंतर झाली आहे. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.