मंडणगड : विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करुन वाचनाकडे वळावे. कारण अवांतर वाचनाने आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. तसेच आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येतो, असे प्रतिपादन प्राचार्य राहूल जाधव यांनी केले. ग्रंथ प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ पंधरवडानिमित्त महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व मराठी भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. धनपाल कांबळे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. महादेव वाघ, आदी उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत प्रा. संजयकुमार इंगोले यांनी केले व आपल्या प्रास्ताविकात ग्रंथप्रदर्शन व मराठी भाषा संवर्धन बाबतचा उद्देश स्पष्ट करुन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 20/Jan/2025














