राजापूर : सागवे येथील कात्रादेवीचा आज वार्षिक यात्रोत्सव

राजापूर : राजापूर तालुक्यातील सागवे येथील प्रसिध्द श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.

यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी विविध ठिकाणांहून मोठ्यासंख्येने भाविक येत असतात. त्यांच्या सोयीकरीता राजापूर एस.टी. आगारातून स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, विजयदुर्ग आगारातूनही गाड्या सोडण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी यात्र म्हणून सागवे येथील श्री कात्रादेवीच्या यात्रेचा नावलौकिक आहे. या यात्रा काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्यासंख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

मंगळवारी ही यात्रा होत असून ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांच्या सेवा सुविधांबरोबरच यात्रेत येणारे व्यावसायिक यांना दुकान गाळे व योग्य जागा उपलब्ध करून देणे, जागेची सफाई करणे, यात्रास्थळी वाहन पार्किंग व्यवस्था व वाहतूक व्यवस्था अशी कामे सुरु आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 21/Jan/2025