संगमेश्वर : धामणी रेल्वे स्टेशन जवळ वाहन अपघात; तीन जखमी

संगमेश्वर : मुंबई-गोवा हायवे रोडवर रात्री एक मोठा वाहन अपघात झाला, ज्यामुळे तीन जण जखमी झाले आणि दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री २१:३० वाजता, मौजे धामणी रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

अनिल लक्ष्मण भिडे यांच्या मालकीची मारुती व्हॅगनार गाडी (क्र. एम. एच ०८ एएन ८१७२) चालक संजय श्रीधर कदम हे घेऊन धामणी येथे जात असताना, मुंबई बाजुकडून गोवा बाजुकडे येणारी मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो (क्र. एम. एच ०८ ए. पी ६४३८) चालक आरोपी दानिश बावाअल्ली वागळे यांनी अचानकपणे ओव्हरटेक करून समोरून व्हॅगनार गाडीला जोराची ठोकर दिली. या अपघातात संजय श्रीधर कदम, वय ४८ वर्षे, रा. नावडी संगमेश्वर, वैभव राजाराम मुरकर, वय ४२ वर्षे, रा. नावडी संगमेश्वर, ओंकार मनोहर भिडे, वय ४० वर्षे, रा. संगमेश्वर, बाजारपेठ हे जखमी झाले. फिर्यादी सिद्धेश प्रभाकर सावंतने २० जानेवारी २०२५ रोजी ०२:१८ वाजता गुन्हा दाखल केला. आरोपी दानिश बावाअल्ली वागळे विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), मो. वा. का. क. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 21-01-2025