रत्नागिरी : दक्षिण सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत झालेल्या विकासकामांचे अजूनही जवळपास ७० कोटी ठेकेदारांचे देणे आहे. राज्यातील सरकार बदलून देखील या ठेकेदारांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नव्याने निघालेल्या ३० कोटींची विकासकामे घेण्यासाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
सार्वजनिक बांधकामच्या दक्षिण विभागाकडे रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर हा भाग येतो. यापूर्वीच्या महायुती सरकारची सत्ता असताना जिल्ह्यात ठेकेदारांकडून सुमारे १५० कोटीची विकासकामे करण्यात आली होती; परंतु तत्कालीन सरकारने लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, महिलांना ५० टक्के एसटी प्रवासात सवलत आदी योजना अंमलात आणल्या. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडल्याने ठेकादरांच्या देयकाकडे दुर्लक्ष झाले. याबाबत ठेकेदारांनी आंदोलन केल्यानंतर तत्काळी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी १५० कोटींपैकी काही कोटी रक्कम जिल्ह्याला दिले. तरीसुद्धा ७० कोटीच्यावर ठेकेदारांची देणे आहे. यामुळे ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 21/Jan/2025














