रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी खाडी किनाऱ्यावरील जेटीचा काही भाग धोकादायक बनला असून, तो कोसळण्याची शक्यता आहे. या भागात काही मच्छीमारी होडयाही उभ्या करून ठेवल्या जातात. त्यामुळे या जेटीची दुरुस्ती करा, अशी मागणी केली आहे.
काळबादेवी किनाऱ्यावर अगदी टोकाला दर्ग्याशेजारी जेटी आहे. येथे काही होड्या असतात तसेच त्यापुढे गेल्यानंतर श्री रामेश्वर मंदिर व श्री कालिका मंदिर भागातही मच्छीमारांच्या होडया असतात. दर्ग्याशेजारी जेटीची तत्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. या ठिकाणी एका बाजूला खाडी व दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. त्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकृष्ट करणारा निसर्गम्य भाग म्हणून काळबादेवी प्रसिद्ध आहे. लहान-मोठे मच्छीमार या भागात आपल्या होड्या लावतात; परंतु जेटीला भगदाड पडलेले असल्यामुळे येथून येणे-जाणे तसे धोक्याचेच आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 22/Jan/2025














