चिपळूण : सामाजिक वनीकरण चिपळूणच्यावतीने खैर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वा. सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे हा मेळावा होणार आहे. विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून हा मेळावा होत असून, जिल्ह्यातील खैर लागवड शेतकरी, उद्योजक, खरेदीदार यांच्यासाठी हा मेळावा आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल श्री. परदेशी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 22/Jan/2025














