संगमेश्वर : परचुरीतील जनार्दन पवार यांची व्हिलचेअर क्रिकेटसाठी राज्य संघात निवड

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावचे सुपूत्र महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ रत्नागिरी येथे असणारे कार्यरत विश्वसमता कलामंच लोवले संगमेश्वरचे संघटक जनार्दन पवार यांची व्हिलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

व्हिलचेअरवर बसून फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण केले जाते. त्यामुळे साहजिकच दिव्यांग्याचे मनोबल वाढविणारी ही अनोळखी क्रिकेट स्पर्धा हैद्राबाद येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना तेलंगणा यांच्याविरुद्ध होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 22/Jan/2025