राजापूर : अर्जुना नदीपात्रात पूर्व भागातील काही भागांसह गोठणे दोनिवडे, शीळ, उन्हाळे परिसरासह धाऊलवल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी करूनही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
आता तर तालुक्यात अर्जुना नदीपात्रात पूर्व भागातील काही भागांसह गोठणेदोनिवडे, शीळ, उन्हाळे परिसरासह धाऊलवल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. अगदी राजरोसपणे दिवसा व रात्री हे उत्खनन केले जात आहे. शहरापासून अगदी दोन ते तीन किलोमिटर अंतरावर महामार्गावर नदीपात्रात गाड्या लावून हे उत्खनन केले जात आहे. प्रशासनाची मात्र याकडे डोळेझाक होत आहे.
अवैध व विनापरवाना वाळू उत्खनना विरोधात एकही कारवाई प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आशीर्वादानेच अशा प्रकारे तालुक्यात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत.
अणसुरेतील कच उत्खनानावर कारवाई नाही
तालुक्यातील अणसुरे खाडीत बेकायदा कच उत्खनन प्रकरणी प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी पाहणी करून अहवाल प्रांताधिकारी यांना सादर केला. प्रत्यक्षात मात्र अद्यापही या व्यावसायिका विरोधात कारवाई झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 23/Jan/2025














