रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी शहर संघटनेतर्फे साळवी स्टॉपच्या टाकीवर झाकण बसवावे, अशी मागणी नगरपालिकेकडे केली होती. त्याची तत्काळ दखल घेत पालिका प्रशासनाने कार्यवाही केली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे, असे रत्नागिरी शहर संघटक आणि माथाडी कामगार सेनेचे राज्य उपचिटणीस अमोल श्रीनाथ यांनी सांगितले.
मनसेतर्फे दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी नगर पालिकेला निवेदन देत रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या न बसवलेल्या झाकणासंदर्भात तक्रार मांडली होती. उघड्या झाकणामुळे पाण्यात पशूपक्षी तसेच इतर मार्गे विषारी घटक व घाण टाकीत जाऊन पाणी दूषित होत होते. लवकरात लवकर झाकण न बसवल्यास मनसेने आंदोलनाचा इशाराही दिला होता; परंतु मनसेने निवेदन देताच काम झालेले दिसून येत आहे. सर्वत्र रत्नागिरीकरांकडून या बाबतीत कौतुक होताना दिसत आहे. अमोल श्रीनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामाचा आलेख चांगला आखलेला दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 23/Jan/2025














