रत्नागिरी : शहराला लागुनच असणाऱ्या उद्यमनगर राजापूरकर कॉलनी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
येथे रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यात दगड टाकून ठेवले असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी या दगडावर आपटून एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. या खड्याच्या शेजारीच रस्त्या मधून लोखंडी सळ्या देखील बाहेर आल्याचे दिसत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 24-01-2025














