रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्र भर धमाकूळ घालणारे धमाल विनोदी नाटक.. आज्जी बाई जोरात…. लोकप्रिय गायिका शरयू दाते व वाद्यवृंद यांचा संगीत नजराणा… मेलोडीयस मुव्हमेंट्स… आणि रसिक ज्याची कायम वाट पाहत असतात असा आर.डी.बर्मन यांच्या गाण्याचा बहारदार इन्स्ट्रुमेंटल संगीत संध्या हा कार्यक्रम असे 3 कार्यक्रम ते ही एकाच तिकिटात तिकीट दरात उपलब्ध आहेत.
2000/-,1500/-1200/-900/- (तीन दिवसांचे एकत्रित मुल्य)…. ही सुवर्ण संधी गमावू नका… आजच आपले तिकीट बुक करा… तिकीट बुकिंग साठी संपर्क आरती डायनिंग, आठवडा बाजार ,अमेय ज्वेलर्स धनजी नाका ,कॉमप्टेल कॉम्प्युटर आरोग्य मंदिर आणि वि. दा. सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर येथे उपलब्ध आहेत.
आपले एक तिकीट सुद्धा मोलाचं ठरणार आहे. या सर्व निधी संकलातून लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे नवीन आय हॉस्पिटल उभे रहाणार आहे. तसेच डायलेसिस सेंटर, ब्लड बँक यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. या सर्व उपक्रमांसाठी आपले सहकार्य मोलाचे ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाची तिकिटे घ्यावीत, असे आवाहन लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ संतोष बेडेकर आणि लायन्स क्लब चे अध्यक्ष गणेश धुरी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 24-01-2025














