रत्नागिरी : तालुक्यातील गोळप- परशुरामनगर येथे कर्जाचे हफ्ते भरा, असे सांगितल्याच्या रागातून एकाला तीन महिलांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. ही घटना बुधवार दि. २२ जानेवारी रोजी सध्यांकाळी ४.४५ वा. सुमारास घडली.
याप्रकरणी संशयित तीन महिलांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात चंदन चंद्रकांत पावसकर (३१, रा.पावस, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, संशयित आरोपी तीन महिलांनी एक वर्षापूर्वी फिर्यादी चंदन पावसकर यांची पत्नी अन्वी हिच्या नावे बचत गटाचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यांनी कर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे बचत गटाचा वसुली अधिकारी फिर्यादींच्या घरी कर्ज वसुलीसाठी येऊ लागला. म्हणून फिर्यादी चंदन पावसकर हे बुधवार २२ जानेवारी संशयितांच्या घरी गेले. त्यांनी संशयितांना कर्जाचे हफ्ते भरा, असे सांगितले. मात्र, याचा राग आल्याने संशयित महिलांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून उजव्या डोळ्यावर मारुन दुखापत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 24/Jan/2025














