रत्नागिरी : माजी आमदार राजन साळवी यांचे पुत्र शुभम साळवी यांचे व्यावसायिक भागीदार रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिनकर सावंत यांची गुरुवारी एसीबी कार्यालयात चौकशी झाली.
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा मुलगा आणि पुतण्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ते येथील येथील एसीबी कार्यालयात चौकशीला सामोरे गेले आहेत. रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर संबंधित बांधकाम साइट आहे. एसीबीने जी नोटीस पाठवली आहे. त्यात या साइटचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याचा एसीबीने जबाब नोंदवला होता. आता त्यांचे व्यावसायिक भागीदार दिनकर ऊर्फ दिनू सावंत यांची चौकशी करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी सावंत यांनी एसीबीची नोटीस स्वीकारली होती. रत्नागिरी पालिकेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेन्सिंगचे काम सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र केले होते. शुभम साळवी यांनी दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची चौकशी झाली. त्यांना साळवी कुटुंबासोबत भागीदार असताना टेंडर फाइल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली आहेत.
एसीबीने दिलेल्या नोटिशीत साळवी कुटुंबीयांविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख आहे. राजन प्रभाकर साळवी, त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध १८ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 24-01-2025














