चिपळूण : शहरालगतच्या परशुराम घाटात शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री गाडी अडवून तिघांना मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी क्रमांक चार मोईन सदाकत पेचकर याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी मोईन पेचकर यांच्यावतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. बोरकर यांनी मोईन पेचकर याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 24/Jan/2025














