दापोली : कुडावळे शाळेची अंशुल पाटील नासा- इस्त्रो दौऱ्यासाठी तीनवेळा ठरली पात्र

दापोली : नासा इस्त्रो या अभ्यास दौऱ्यासाठी दापोली शिक्षण विभागाचा दरवर्षी चढता आलेख दिसत आहे. तालुक्यातील कुडावळे शाळेची अंशुल पाटील नासा इस्त्रो दौऱ्यासाठी तीन वेळा पात्र ठरली आहे. २०२३ या वर्षी अंशुलची इयत्ता पाचवीमधून इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र ती त्यावर्षी इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी गेली नाही. पुन्हा २०२४ यावर्षी तिची इस्त्रो दौऱ्यासाठी निवड झाली आणि तिने इस्रो दौऱ्यात सहभाग घेतला. यावर्षी पुन्हा तिची इयत्ता सातवीमधून नासा दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 24/Jan/2025