रत्नागिरी : जागा नावावर करण्याच्या कारणातून महिलेला मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे दारूच्या नशेत येऊन फिर्यादी महिलेची मावशी रहात असलेली जागा नावावर करून देण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या मावशीला, फिर्यादीला तसेच तिच्या जावेला मारहाण केली. ही घटना बुधवार २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास घडली. चंदन चंद्रकांत पावसकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादी महिलेने पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित चंदन पावसकर हा दारुच्या नशेत आला. त्यानंतर त्याने फिर्यादीची मावशी रहात असलेली जागा नावावर करुन देण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या मावशीला लाथाबुकक्यांनी व हातांनी मारहाण केली. त्या नंतर फिर्यादीच्या जाउला कोयती मारुन व फिर्यादी महिलेला लाकडाने पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२) ३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 25/Jan/2025

Infigo Eyecare