रत्नागिरी : शहरातील राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर येथे घराच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) ते गुरुवारी (ता. ९) सकाळी अकराच्या मुदतीत राजापूरकर कॉलनी, गांधीपार्क अपार्टमेंट येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनित इस्माईल काझी (५३) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८टी ०६५६) ही गांधीपार्क अपार्टमेंट येथील पार्कीग मध्ये पार्क केली होती अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी काझी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 25-01-2025














