रत्नागिरी : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल, असे वाहन पार्क करणाऱ्या प्रवासी वाहनचालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर बबन मते (वय ४५) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळी साडेअकराच्या सुमारास आरवली ते मुरडव जाणाऱ्या रस्त्यावर आरवली पुलाखाली निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने प्रवासी वाहन सार्वजनिक रस्त्यावर अडथळा होईल, असे पार्क केले. याप्रकरणी पोलिस नाईक अनिकेत चव्हाण यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 25-01-2025














