रत्नागिरीत सोमवारी बाल साहित्य संमेलन

रत्नागिरी : दुसरे बाल साहित्य संमेलन सोमवार २७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वेळेत येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बाल साहित्य संमेलनाचे आयोजक शौकत गोलंदाज यांनी दिली.

शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत या बाबत माहिती देण्यात आली. यावेळी सीमा कदम यांच्यासह अन्य उपस्थित होते. सोमवारी सकाळी ९ वाजता दामले विद्यालय येथून ग्रंथ दिंडी मारुतीमंदीर ते नाट्यगृह अशी निघणार आहे. प्रत्यक्ष संमेलनाची सुरुवात सकाळी १० वाजता होईल.

या बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व सुभाष लाड हे आहेत. तर प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी या असणार आहेत तर बालसाहित्यिक म्हणून ईश्वरी लखामोडे व उवेद शेकासन हे उपस्थित राहणार आहेत. बाल साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये वृंदा कांबळी या गोष्टींचा तास घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात कवी श्रीकांत ढालकर यांचे व्याख्यान असणार आहे.

संमेलनात तिसऱ्या सत्रामध्ये नाट्य अभ्यासक व प्रशिक्षक मा. प्रीतेश कोसवे हे ओळख नाट्यपदरांची याच्यावर व्याख्यान आहे. त्यानंतर छकुल्यांचे साहित्य विचार मध्ये प्रचीती पातये, श्रुती नानिवडेकर व सोनाली खताते हे विचार व्यक्त करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षीस वितरण समारंभ ही यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

या संमेलनात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे तसेच बाल साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्याचे प्रकाशन या संमेलन प्रामुख्याने होणार आहे. प्रचिती पातये हीचा काव्य प्रचिती हा काव्यसंग्रह तर इतर मुलांनी तयार केलेला शब्दकळ्या हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 25/Jan/2025