रत्नागिरी : गोवा येथे रोहारी कॉलेजमध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नॉएसिस इव्हेंट-२०२५ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील १० विद्याथ्यानी सक्रिय सहभाग घेतला. नॉएसिस इव्हेंट २०२५ मध्ये विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
ज्यामध्ये ऑफलाइन प्लेझोन-गेमर्स ओ स्पर्धेत रितिक दुबे व नयन गुरव यांनी पहिला पुरस्कार मिळवला. बग इट स्पर्धेत वृशकेत मुळ्ये व वेदांग पाटणकर यांनी दूसरे स्थान मिळवले. पीच परफेक्ट व रेबुटल रेबल्स या दोन स्पर्धांमध्ये पार्थ मुळ्ये व वैष्णवी शिरसाठ यांनी दुसरे स्थान मिळवले. विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक आणि गेमिंग स्पर्धांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, सहकार्य आणि सर्जनशीलता दाखवली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उच्च दर्जाच्या शिक्षण आणि समर्थनाचे प्रतिबिंब आहे, असे मत प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी व्यक्त केले. विजेत्यांचे अभिनंदन उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेत यश मिळवण्यासाठी प्रा. अनुजा घारपुरे आणि अमोल सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 25/Jan/2025














