एसएस मोबाईलच्या ‘बिग रिपब्लिक सेल’मध्ये एक पे तीन ऑफर

कोल्हापूर : एसएस मोबाईलकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘बिग रिपब्लिक सेल एक पे तीन ऑफर्स’ जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना, स्मार्टफोन खरेदीवर तीन फायदे मिळणार आहेत. अविश्वसनीय अशा आकर्षक गिफ्ट, २ वर्षांची वॉरंटी आणि ३० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

आयफोन १३ सीरिज, सॅमसंग एस २५ सीरिज आणि वनप्लस १३ सीरिजवर विशेष फायदे दिले आहेत. आयफोन १३ आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत, सॅमसंग एस २५ सीरिजच्या प्री-बुकिंगवर अविश्वसनीय सवलत आणि वनप्लस १३ सीरिजवर मोठी कॅशबॅक व डिस्काऊंट देण्यात येत आहे. एआय फोन्सवर आकर्षक किमतीचा साऊंड बार फ्री, ५-जी फोन्स चक्क ७,००० रुपयांपासून आणि बजेट स्मार्टफोन अविश्वसनीय कमी किमतीत मिळवण्याची संधी आहे. ब्रँडेड अॅसेसरीजवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट आणि स्मार्ट टी. व्ही. वर साऊंड बार फ्री मिळणार आहे. एसएस मोबाईलच्या सर्व ३५० शाखांमध्ये बिग रिपब्लिक सेल सुविधा उपलब्ध असून, सर्व नामांकित फायनान्स कंपन्या, डेबिट व क्रेडिट कार्डवर ईएमआयची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी जवळच्या एसएस मोबाईल स्टोअरला भेट द्या, असे आवाहन एसएस मोबाईल्सच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 25/Jan/2025