रत्नागिरी : दिव्यांगांसाठी वाहनांवरील दुकान मोफत योजना

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी 06 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केला आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. ३. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हे या योजनेचे उद्देश आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 25/Jan/2025