लायन्स आर्ट ॲन्ड म्युझिक फेस्ट या तीन दिवसीय कार्यक्रमाची तिकीट विक्री धुमधडाक्यात सुरू

रत्नागिरी : दिनांक ३१ जानेवारी व १ आणि २ फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या लायन्स आर्ट ॲन्ड म्युझिक फेस्ट या कार्यक्रमाची तिकीट विक्री धुमधडाक्यात सुरू आहे.

तिकीट विक्री ला सुरुवात होताच काही दिवसांतच अनेक रत्नागिरीकर रसिकांनी तिकीट घेऊन आमच्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला. त्याबद्दल लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चे अध्यक्ष लायन गणेश धुरी व त्यांच्या टिमने सर्वांचे आभार मानले व थोडीच तिकीटे शिल्लक असल्याने लवकरात लवकर आपली तिकीटे बुक करून निराशा टाळावी, असे आवाहन सुद्धा केले आहे.

आपले एक तिकीट सुद्धा मोलाचं ठरणार आहे. त्यामुळे लवकरच तिकीट बुकिंग करावे, असे आवाहन करण्यत आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 27-01-2025

Gadre1