चिपळूण : सावर्डे ग्रामपंचायतमधील दालनात वातानुकूलित यंत्रणा बसवणे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह संबंधित ग्रामसेवकांना महागात पडणार आहे. ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अशी यंत्रणा बसवता येत नाही. याप्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी केलेला ठराव चुकीचा आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यासह सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी अशोक काजरोळकर यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार पंचायत समिती स्तरावरून ही कारवाई केली जात आहे. शासनाने सरकारी अधिकारी यांना वातानुकूलित यंत्रणा कोणत्या ग्रेडच्या अधिकाऱ्यांना वापरता येईल, याचे परिपत्रक काढले आहे. अशातच सावर्डे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या दालनात विनापरवाना वातानुकूलित यंत्रणा बसवली. या
यंत्रणेचा खर्च व त्याचे बीज बिल हे सामान्य जनतेच्या करातून भरले जाते. या विरोधात काजरोळकर यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणेची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रारीनंतर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एस. कांबळे यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
त्यांनी दिलेल्या अहवालात तत्कालिन ग्रामविकास अधिकारी पवार यांनी बेकायदेशीरपणे वातानुकूलित यंत्रणा पूर्ण बसवल्याचे स्पष्ट केले आहे. पवार यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापरप्रकरणी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उमा घारगे-पाटील यांनी सांगितले.
सावर्डे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी के. डी. पवार यांनी आपल्या अधिकाऱ्याचा नियमबाह्य वापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. ग्रामपंचायतीला कशाही पद्धतीने ठराव करण्याचे अधिकार नाहीत. चुकीचा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीलाही नोटीस दिली जाणार आहे. –उमा घारगे-पाटील, गटविकास अधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 27/Jan/2025













