खेड : गुणदे नजीक एसटी- दुचाकीचा अपघात

खेड : तालुक्यातील गुणदे-वावळीवाडी थांब्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात संतोष बाबू आंब्रे (48, रा. गुणदे-तांबडवाडी) जखमी झाले. अपघातप्रकरणी बसचालक हनुमंत विक्रम भाबड (39, एसटी आगार खेड) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष आंब्रे हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.08/ ए.एफ. 9175) घेवून जात असताना समोरून येणाऱ्या बस (एम.एच 40/एन.9723) ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराला गंभीर दुखापत झाल्याने नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. हलगर्जीपणाने बस चालवून दुचाकीस्वारास जखमी करत दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 27-01-2025