रत्नागिरी : योगगुरू विरू स्वामी यांना उद्योगरत्न पुरस्कार

रत्नागिरी : निरामय योगा क्लासेसने सर्वोत्कृष्ट योगा क्लासेसचे नामांकन पटकावून विरू स्वामी यांनी महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५ पटकावला.

निरामय योग संस्था ही रत्नागिरीतील नामांकित योगसंस्था असून संस्थेचेच सर्वेसर्वा योगगुरू विरू स्वामी सर यांना नाशिक येथील एका भव्य कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५ देण्यात आला.

योग क्षेत्रात करित असलेल्या भरीव कार्याची दखल घेत अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 27-01-2025

Arihant 3