गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सव निमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
३० जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता विधीवत गणेशपूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, सकाळी ८ वाजता आरती, सायंकाळी ६ वाजता आरती, रात्री ९.३० वाजता प्र. ल. मयेकर लिखित व दशरथ रांगणकर दिग्दर्शित दोन अंकी कौटुंबिक नाटक “डॅडी आय लव यू” सादरकर्ते अजिंक्यतारा थिएटर्स गणेशगुळे.
३१ जानेवारी रोजी सकाळी ६.३० विधिवत गणेशपूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली सकाळी ८ वाजता आरती, दुपारी २ ते ५ या वेळेत महिलांचे हळदी-कुंकू आणि अधिरा अक्षय गुरव यांच्याकडून लाडू वाटप, दुपारी ३ ते ५ वाजता दत प्रासादिक भजन मंडळ चिंचखरी बुवा जयवंत बोरकर यांचे भजन, सांयकाळी ६ वाजता आरती, रात्री ९.३० वाजता श्रमेश बेटकर लिखित आणि प्रकाश विष्णू लाड दिग्दर्शित दोन अंकी धमाल विनोदी नाटक “वाकडी तिकडी” सादरकर्ते लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई.
१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता विधिवत गणेश पूजन, अभिषेक, मंत्रपुषांजली, सकाळी ८ वाजता आरती, सकाळी ९ वाजता हदय आत्माराम लाड आणि रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप, सकाळी ११ ते १२.३० वाजता जन्मोत्सव कीर्तन -बुवा आनंद ओळकर कशेळी, दुपारी १२.३० वाजता श्रींची पालखी मिरवणूक, दुपारी १२.३० ते ३ यावेळेत हदय आत्माराम लाड आणि रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप, सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून जिलेबी वाटप, रमेश राजाराम तोडणकर यांच्याकडून वडावाटप, दुपारी १ ते २ या वेळेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ आंबेशेत (रत्नागिरी) बुवा शुभम वायंगणकर
दुपारी ३ वाजता सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ (भडे) बुवा अशोक सुवै, सांयकाळी ४ वाजता काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ (गणेशगुळे) बुवा संदेश तोडणकर, सांयकाळी ६ वाजता आरती, रात्री ९ वाजता नाटककार, देणगीदार आभार प्रदर्शन व क्रिकेट बक्षीस वितरण समारंभ, रात्री १०.३० वाजता मधुसूदन कालेलेकर लिखित आणि प्रकाश पेटकर दिग्दर्शित दोन अंकी कौटुंबिक विनोदी नाटक “नाथ हा माझा” सादरकर्ते तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई.
२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता विधिवत गणेशपूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, सकाळी ८ वाजता आरती, सांयकाळी. ६ ते ९ या वेळेत ढोलवादन स्पर्धा, रात्री ९.३० वाजता ढोलवादन स्पर्धा बक्षीस वितरण, रात्री १० वाजता विश्राम सुत लिखित आणि संदेश तोडणकर दिग्दर्शित दोन अंकी विनोदी मालवणी नाटक “झिलग्यांची खोली” सादरकर्ते सिध्दगिरी कलामंच गणेशगुळे.
या कार्यक्रमाचा लाभ घ्या, असे आवाहन श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे अध्यक्ष प्रसाद सुनील तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत मधुकर गुळेकर, सचिव प्रथमेश सूर्यकांत रांगणकर, सहसचिव राजेंद्र रमेश तोडणकर, कार्याध्यक्ष विक्रांत वामन रांगणकर, खजिनदार संतोष शांताराम गुळेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 27/Jan/2025














