खेड : भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी या पदावर ३२ हजार पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्रातील १० वी उत्तीर्ण आणि १८ ते ३३ या वयोगटातील उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सहभाग असावा यासाठी खेडच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर हॉल येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात प्रा. संजय मोरे मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन शिबीरामध्ये अर्ज कसा करावा आणि या परीक्षेची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन होणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी निशुल्क असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 28/Jan/2025













