राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी शहरात जागृती अभियान

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन बिंदुंपैकी ” नागरी शिष्टाचार जागृती” हा बिंदू समोर ठेवून आज मंगळवारी हनुमान प्रौढ व्यवसायी शाखा, मारूती मंदिर तर्फे नगरातील सर्वाधिक वाहतूक वर्दळ असलेल्या मारूती मंदिर वर्तुळ येथे सकाळी ९.३० ते १०.३० या सर्वाधिक गर्दीच्या वेळेत जागृती अभियान करण्यात आले. यामध्ये २० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

९.१५ वाजता एकत्रित होऊन संघ प्रार्थना म्हटली व अभियानाला सुरुवात झाली. रहदारी तसेच वाहतुकीच्या विविध नियमांबाबत चे ११ संदेश फलक घेऊन मोक्याच्या ठिकाणी स्वयंसेवक उभे राहिले. परिवहन कार्यालयाकडून प्राप्त झालेली छापील पत्रके ही वाहनधारकांना वाटण्यात आली. अशाच प्रकारचे अभियान माळ नका वस्तीतील जुना माळ नका तसेच जेल नाका या वर्दळीच्या ठिकाणी ही या शाखे तर्फे करणे संकलपित आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 28/Jan/2025