खेड : लोटेमाळ येथे २३ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथे वास्तव्यास असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. विकास राजेश सोनी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीतील गटारात पडल्याने जखमी झाला होता.

केमिकलयुक्त पाण्यामुळे त्याचे शरीर काळे पडले होते. जखमी अवस्थेत उपचारासाठी नवी मुंबई येथील कामोठे येथे दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 29/Jan/2025