रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील अल्ट्राटेक कंपनीजवळ गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२० वा. सुमारास करण्यात आली.
गणेश शिंदे (४८, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार विनोद कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित हा अल्ट्राटेक कंपनीच्या जवळ असलेल्या आनंद बेकरीच्या मागील बाजूस आपल्या ताब्यात १८ लिटर गावठी दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 30/Jan/2025














