दापोली : लाडघर बिचवर पर्यटकांची गाडी वाळूत रुतली

दापोली : दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या वाळूत रुतण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढत आहे. समुद्रकिनारी भरधाव वेगाने गाड्या पळवून स्टंटबाजी करण्याचे प्रमाण दापोली समुद्रकिनारी वाढत आहे. यात लाखोंच्या महागड्या गाड्याचे नुकसान होत आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवावर देखील बेतत आहे. मंगळवारी तालुक्यातील लाडघर समुद्रकिनाऱ्यावर एक गाडी वाळूत रुतली होती.

गेल्या दोन महिन्यांत तब्बल १५ ते २० गाड्या वाळूत रुतल्याच्या घटना दापोली समुद्र किनाऱ्यावर घडल्या आहेत. सर्व समुद्रकिनाऱ्यांवर अशा घटना घडू लागल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा स्टंटबाजांना आळा घालणार कोण? असा प्रश्न आता दापोली मध्ये उपस्थित होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 30/Jan/2025