राजापूर : जैतापूर येथे पुन्हा प्राथमिक शाळा बंद आंदोलन

राजापूर : जैतापूर येथे ७ फेब्रुवारीपासून पुन्हा प्राथमिक शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

जैतापूर (ता. राजापूर) येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ या सेमी इंग्रजी शाळेमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक आणी एक सहायक शिक्षक आवश्यक असताना गेल्या अनेक महिन्यांपासून एका कामगिरी शिक्षकाची अदलून बदलून नियुक्ती करण्यात आली. परंतु महिनाभर एकही सहाय्यक शिक्षक शाळेत नाही. राजापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनही शिक्षकाची नेमणूक झालेली नाही. यासाठी पालक तसेच सरपंच यांनी भेटून प्रत्यक्ष विनंती केली, परंतु संबंधित विभागाने त्यावेळी चार-पाच दिवसांत शिक्षक देतो असे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

यामुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी वारंवार विनंती करून आणि आंदोलन करूनही संबंधित विभाग कार्यवाही करत नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी पुन्हा एकदा येत्या ७ फेब्रुवारीपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पाल्याना शाळेत न पाठवण्याचे निवेदन गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ६ फेब्रुवारीपर्यंत शाळेला शिक्षकाची नेमणूक झाली, तर आंदोलनाचा फेरविचार करू, असे शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकांनी कळविले आहे. याबाबत ची प्रत जैतापूरचे सरपंच तसेच आमदार किरण सामंत यांना देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 30-01-2025

Infigo Eyecare