संगमेश्वर : विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

संगमेश्वर : नायरी ते संगमेश्वर जाणाऱ्या रोडवर कोंडउमरेजवळ चारचाकी गाडीमध्ये बैल भरून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी पकडले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शंकर भागोजी वाघमोडे (वय २७, रा. चांदोली, शाहूवाडी) आणि सुदेश सिद्धार्थ सावंत (रा. बौद्धवाडी, तांबेडी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शंकर वाघमोडे आणि सुदेश सिद्धांत सावंत हे २९ जानेवारीला कोंडउमरेजवळील रस्त्यावर मोटारीत दोन बैल हौद्यात भरून विनापरवाना वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निरीक्षक अमित यादव, कामेरकर, मनवळ, सासवे यांनी गाडीसह दोघांना ताब्यात घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 31/Jan/2025