पावस : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील उगवता सडा येथील कातळावर दुपारी एकच्या सुमारास प्रचंड आग लागली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी जाऊन ती आग आटोक्यात आणल्यामुळे परिसरातील हापुस आंब्याच्या बागा सुरक्षित राहिल्या. त्यामुळे कोणतीही वित्तहानी झाली नाही.
उगवता सडा येथे लोहारवाडी, धनगरवाडी असून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या आंबा व काजूच्या बागा आहेत. येथे जाण्यासाठी रस्ता आहे; परंतु बुधवारपासून या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर खड़ी पररवलेली आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करता येईल, असे एकही वाहन आगीच्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे गावात राहणारे सर्व लोक चालत
सड्यावर जाऊन कलमे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करत दुपारी त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यात थोड्याप्रमाणात यश मिळवले; मात्र तरीही आग धुमसत होती. अनेक शेतकरी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत होते; मात्र कातळावर मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे आणि वारा असल्याने आग वेगाने पसरत होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 31/Jan/2025













