राजापूर : वाटूळ येथे आजपासून दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

राजापूर : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वाटुळ येथे १ व २ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनाची सुरुवात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील कोट येथून क्रांतिज्योत आणून होत असते. ही क्रांतीज्योत या पूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी जाऊन सध्या सुरू असलेल्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पोहोचते. त्या अंतर्गतच आज पाचलमध्ये ही क्रांतीज्योत आल्यावर श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या क्रांतीज्योतीचे उत्साहात स्वागत केले. क्रांतिज्योत पाचलमध्ये पोहोचल्यावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी या क्रांतीज्योतीला हार अर्पण करून तिचे स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 01/Feb/2025